Deepa Pardhi – Student Success & Community Leadership Recognition

D 8-3-16-LOKSATTA.jpg

Deepa Pardhi – Student Success & Community Leadership Recognition

On 8th March 2016, the following news article got published about our brilliant student Deepa Pardhi

  • दैनिक लोकसत्ता (दि. ०८ मार्च २०१६ रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित

शिक्षण, घरकाम आणि गावचा कारभार … एकहाती!

लव्हाळीच्या आदिवासी अपंग युवतीची यशोगाथा; शिक्षण पूर्ण करत असतानाच गावच्या सरपंचपदाचीही जबाबदारी
  • सकाळी कॉलेज, दुपारी घरची कामे, त्यानंतर सरपंच या नात्याने गावातील विकासकामांचा पाठपुरावा या तिन्ही आघाड्यांवर उत्साहाने कार्यरत असलेली दीपा सखाराम पारधी ही आदिवासी युवती सध्या अंबरनाथ तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे. अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी या दुर्गम आदिवासी पाड्यावरील या २३ वर्षीय युवतीचा एक हात नाही. मात्र या अपंगत्वामुळे न्यूनगंड येण्याऐवजी तिच्या आत्मविश्वासाने तिला आणखी बळ दिले. मिळालेले सरपंचपद ही संधी मानून दीपाने चरगांव ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यांचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचा चंग बांधला आहे. आपले गाव हाणदारीमुक्त, स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा तिचा ध्यास आहे.
  • दीपाचे वडील सखाराम लव्हाळी गावातच मोलमजुरी करतात. तिचे दोन्ही विवाहित मोठे भाऊ रामदास आणि संभाजी यांनीही अर्धवट शिक्षण सोडून पोटासाठी मोलमजुरी पत्करली आहे. आई जिजामाई गृहिणी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेतास बेत असूनही दोन्ही वडिलभावांनी मात्र धाकट्या बहिणीला उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला. उजवा हात नसणाऱ्या दीपाला शिक्षक व्हायचे आहे. परिसरात कार्यरत असलेल्या लक्ष्य फाऊंडेशनने तिला मदतीचा हात दिला आहे.
  • सध्या दीपा नेरळ येथील महाविद्यालयातून डी.एड.चे शिक्षण घेत आहे. मध्यंतरी काही काळ तिने दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरी करून घराला हातभारही लावला.
  • सध्या ती डी.एड. च्या अंतिम वर्षाला आहे. गेल्या वर्षी अचानक तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. चरगांव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने सुशिक्षित असलेल्या दीपाला शिवसेनेने संधी दिली. चरगाव ग्रामपंचायतीत दीपा राहत असलेल्या लव्हाळी गावाबरोबरच नंबरवाडी, कुडेरान, शिंदीपाडा, बांगरपाडा, बोराडपाडा, कुराडपाडा, साम्बारी या पाड्यांचा समावेश आहे. भौगोलिक क्षेत्र मोठे असले तरी या गावची लोकसंख्या जेमतेम साडेतीन हजार इतकी आहे. सप्टेंबर महिन्यात ती सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आली. अशा रीतीने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी गावाचे नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली. त्यामुळे सकाळी कॉलेज, दुपारी घरकाम आणि संध्याकाळी ग्रामपंचायतीचे काम असा दीपाचा सध्या व्यग्र दिनक्रम आहे. या दिनक्रमात ती अजिबात खंड पडू देत नाही.
  • “आमच्या ग्रामपंचायतीत ३८० घरांना शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट असून ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. गावात नळपाणी पुरवठा योजना आणणे, घरकुल योजना पूर्ण करणे, गावातील रस्ते चांगले करणे, गावात स्वच्छता व आरोग्यावर काम करणे आदी कामे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करणार आहे.” – दीपा पारधी, चरगांव, सरपंच
  • लव्हाळी गावात एकच विहीर आहे. सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन दीपा पारधी आजही डोक्यावर तीन तीन हंडे भरून पाणी आणते.



Scroll to Top