
Diwali Celebration with Tribal Students – Lavhali, Tal. Ambernath (7th November 2010)
Celebrating Togetherness, Not Charity
If we aim to uplift tribal communities, it cannot be from a distance or with a sense of superiority. True impact comes when we walk alongside them, earning their trust and becoming part of their world. With this belief, Lakshya Foundation celebrated Diwali with the students who had been associated with us for several months, receiving free coaching for their upcoming Grade 10 and 12 exams—a journey back to mainstream education that was unprecedented in these villages.
Our intention was simple yet profound: to show that these students were not alone—that education and opportunity could be within reach, without ever compromising their dignity.
A Festival Like Never Before
The celebration was held in Lavhali village, around 60 km from Mumbai, and 10 km from Badlapur railway station, bringing together over 20 students from 15 tribal padas. For many, this was a Diwali they had never imagined: a festival of lights, encouragement, and recognition, not of mere sweets or fireworks.
We distributed educational materials, books, and financial support, turning the festival into a celebration of both culture and learning. The students were honored not only for their participation but also for choosing to step back into the path of education, setting an example for their peers.
A Celebration Recognized Across the Region
This unique Diwali celebration attracted widespread media attention:
- दैनिक पुढारी (8th Nov 2010) highlighted the “Unique Diwali Gift for Tribal Students,” noting that while global leaders celebrate festivals in cities, many tribal children in Maharashtra cannot even mark Diwali. Lakshya Foundation made this possible for them.
- दैनिक महाराष्ट्र (9th Nov 2010) reported how students shared their emotions, expressing hope and gratitude:
“Our dreams of continuing education, halted by poverty, are being revived thanks to Lakshya Foundation. Their support keeps our aspirations alive.”
- Coverage in दैनिक आदर्श बदलापूर, पुण्यनगरी, सन्मित्र, गावकरी, सकाळ, सम्राट मुंबई echoed the same sentiment: a festival intertwined with education, mentorship, and inspiration. International guests, including Ken Ryan from the Dirty Wall Project, Canada, witnessed the celebrations and lauded the Foundation’s efforts.
- Janvi Charitable Trust’s Asha Tai Mittu encouraged the students with heartfelt guidance:
“If you want to improve your life, embrace education. Let pride guide you in good deeds and shame guide you away from wrongs.”
We got recognised and covered in news for this :
- दैनिक पुढारी (दि. ०८ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- आदिवासी विद्यार्थ्यांना अनोखी दिवाळी भेट
- आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मुंबई मध्ये होली नेम या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर आपली दिवाळी साजरी केली. परंतु राज्यासह देशातील हजारो आदिवासी विद्यार्थी मागासलेपणा आणि गरीबीमुळे दिवाळी साजरी करू शकत नाही हे वास्तव आहे. अशाच आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांबरोबर रविवारी लक्ष्य फाउंडेशन तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली.
- मुंबईपासून 60 किलोमीटर लांब आणि बदलापूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लव्हाळी या आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी करण्यात आली. लक्ष्य फाउंडेशन चे अध्यक्ष शिरीष पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी हा योगायोग जुळवून आणला. घरची परिस्थिती बिकट असल्याने अर्धवट शिक्षण सोडून परंपरागत पद्धतीने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर ही दिवाळी साजरी करण्यात आली.
- यावेळी या भागातील 20 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना लक्ष्य फाऊंडेशनमार्फत शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाऊबीज आणि पाडव्याचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकीच्या हेतूने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत देऊन ही दिवाळी साजरी करण्यात आली.
- आदिवासी विद्यार्थ्यांना अनोखी दिवाळी भेट
- दैनिक महाराष्ट्र (मुंबई) टाइम्स (दि. ०९ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- आदिवासींच्या संगतीने ‘लव्हाळी’ त दिवाळी
- दिवाळी हा सणांचा राजा… सर्वांना आनंद देणारा हा सण… या आनंदात आदिवासी पाड्यावरील गरीब आणि गरजू मुलांनाही वाटकेरी होता यावं, यासाठी लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने रविवारी बदलापूरच्या ‘लव्हाळी’ या आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी करण्यात आली.
- आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना लक्ष्य फाऊंडेशन मार्फत सर्वतोपरी मदत केली जाते. सामाजिक बांधिलकीच्या हेतूने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत देऊन ही दिवाळी साजरी झाली. घरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून परंपरागत दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी किंवा तत्सम काही कामधंदा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह हा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला त्या भागातील वीसहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
- ‘आर्थिक परिस्थितीमुळे पुढच्या उपक्रम शिक्षणाचे स्वप्न अर्धवट राहिले होते. ते स्वप्न लक्ष्य फाऊंडेशनने केलेल्या मदतीमुळे पूर्ण होऊ शकते. या फाऊंडेशनमुळेच पुढील शिक्षणाची उमेद कायम राहिली आहे, या संस्थेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे पुढील शिक्षणाच्या आमच्या आणि कुटुंबाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत’, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट वाट काढून दिली.
- कॅनडासारख्या प्रगत देशातील सार्माा कार्यकर्ते केन या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना या संस्थेच्या लक्षणीय कार्याची प्रशंसा केली.
- “आपल्या घरची आर्थिक परिस्थिती नष्ट करायची असेल तर शिक्षण घ्या, चांगल्या कामाला टाळू नका, चुकीच्या कामाची लाज धरा.” असा मोलचा सल्ला या कार्यक्रमाला हजर असलेल्या ‘जान्हवी चारिटेबल ट्रस्ट’ च्या आशाताई यांनी विद्यार्थ्याना दिला. पाडवा आणि भाऊबीजेची ही आगळीवेगळी भेट मिळाल्याने इथल्या विद्यार्थ्यांचे चेहरेही आनंदाने उजळले होते.
- आदिवासींच्या संगतीने ‘लव्हाळी’ त दिवाळी
- दैनिक आदर्श बदलापूर (दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे लक्ष्य फाऊंडेशन
- बदलापूर :- मुंबईपासून अवघ्या ६० कि.मी. अंतरावरील बदलापूर जवळील लव्हाळी आणि इतर आसपासची १५ आदिवासी पाड्यातील अर्धवट शिक्षण सोडलेल्या आणि घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य लक्ष्य फाऊंडेशन ही संस्था करीत आहे.
- या संस्थेचे अध्यक्ष शिरीष पाटील यांना त्यांच्या संस्थेच्या उपक्रमाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, मुंबई पासून अवघी काही कि.मी. आणि बदलपुर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव हे आजही कष्टदायक जीवन जगत आहेत. त्यांच्यात आणि आधुनिक शहरी जीवन जगत असलेल्या शहरी जिवनाचा विचार केल्यास यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आणि दरी असल्याचे दिसून येते याबाबींचा आणि अर्ध्यावरच शिक्षण सोडणे हे त्याचे मुख्य कारण असल्याचे दिसून आले त्याकरिता आमच्या फाऊंडेशनने आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे व त्याकरिता आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देऊ करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार आदिवासी पाड्यांमध्ये जावून सर्व्हे केला आणि ज्या विद्यार्थ्यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडले होते वा ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते त्यांचे १७ नं. फॉर्म भरून घेतले व त्यांना १० वीच्या परिक्षेस बसविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता क्लासेसची फी, त्यांच्या पाड्यापासून बदलापूर पर्यंत जाण्या-येण्याकरिता बसेसच्या मासिक पास तसेच वह्या, पुस्तकेसह सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्यांची त्यांना मदत देवू केली.
- पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन या विद्यार्थ्यांना पुन:श्च मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य फाऊंडेशनने केले आहे. इ. १० वी, १२ वी उत्तीर्ण होवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अथवा शासकीय, निम शासकीय नोकरी त्यांना प्राप्त व्हावी याकरिता त्यांना मार्गदर्शन फाऊंडेशनच्या वतीने दर महिन्याच्या ३ रा व ४ था शनिवार, रविवार रोजी करण्यात येत असते.
- लक्ष्य फाऊंडेशनच्या वतीने नुकतीच भाऊबीज व पाडव्याचे निमित्त साधुन या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी लक्ष्य फाऊंडेशनने मदत केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भेटीकरिता खास कॅनडावरुन आलेले डर्टो वॉल प्रोजेक्टचे केन रेयॉन यांनीही फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जान्हवी चेरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आशाताई मित्तू यांनी विद्यार्थ्यांना घरची आर्थिक परिस्थिती सुधारवयाची असेल तर शिक्षण घ्या आणि शिक्षण घेणे हे चांगले कार्य आहे त्यामुळे चांगल्या कामाची लाज धरुनका, वाईट कामाची लाज धरा असा मौलिक सल्ला दिला. यावेळी लक्ष्य फाऊंडेशनचे अध्यक्ष शिरीष पाटील यांच्यासह शैक्षणिक समन्वयक राजेंद्र सूर्यवंशी, संस्थेचे सदस्य ललिता पाटील, मुकेश वलोद्रा, प्रविण सावळे, वैशाली सावळे, चंद्रकांत कडव, समन्वयक अनिल जाधव, विशाल भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे लक्ष्य फाऊंडेशन
- दैनिक पुण्यनगरी (दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- कॅनडाच्या कार्यकर्त्यांबरोबर दिवाळी साजरी
- अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी या आदिवासी पाड्यावर मुंबईच्या लक्ष्य फाऊंडेशनच े शिरीष पाटील व त्यांच सहकारी त्याचप्रमाणे कॅनडामधून भारत भेटीला आलेले सामाजिक कार्यकर्ते केनसर यांनी नुकतीच आदिवासी गरीब विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. मुंबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या व अंबरनाथ तालुक्यामधील लव्हाळी या आदिवासी पाड्यामध्ये लक्ष्य फाऊंडेशन या संस्थेद्वारे भाऊबीज, पाडवा, दीपावली, या सणांचे महत्त्व सांगत पाड्यामधील नागरिकांसमवेत आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी आदिवासी मुला-मुलींच्या उज्ज्वल शैक्षणिक योजनेकरिता कॅनडाचे समाजसेवक केनसर आणि लक्ष्य फाऊंडेशनच्या वतीने सर्व तऱ्हेची मदत करण्याचे सांगण्यात आले.
- लक्ष्य फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात येत असून सध्या ३० विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत, असे लक्ष्य फाउंडेशनचे शिरीष पाटील यांनी सांगितले.
- कॅनडाच्या कार्यकर्त्यांबरोबर दिवाळी साजरी
- दैनिक सन्मित्र (दि. १२ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- लक्ष्य फाउंडेशनची दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसह साजरी.
- लक्ष्य फाउंडेशन बदलापूर या सामाजिक संस्थेने अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी गावातील 15 आदिवासी पाडय़ातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसमावेत दिवाळी व भाऊबीज सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
- लक्ष्य फाउंडेशनच्या शिक्षक, अभियंते व कार्यकर्त्यांनी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्यचे अध्यक्ष शिरीष पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य आबासाहेब चासकर, जान्हवी चारिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आशाताई मित्तू, कन्नडा च्या डर्टी वॉल प्रोजेक्टचे केन रायन, पत्रकार ग. वि. खरात हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पत्रकार, आबासाहेब चासकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेची गळती थांबविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल लक्ष्य फाउंडेशन चे अभिनंदन केले.
- मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी बांधव आजही वर्षानुवर्षे अत्यंत कष्टदायक जीवन जगत आहेत. त्यांच्यात असलेल्या शिक्षणाचा अभाव लक्षात घेऊन लक्ष्य फाऊंडेशन पुढे सरसावली आहे. आदिवासी भागातील इयत्ता ५ वी ते १० वी मधील अनेक विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून देतात. त्यामुळे शासनाने आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आखलेल्या विविध योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागते. त्यामुळेच त्यांना वर्षानुवर्षापासून चालत आलेले कष्टप्रद जीवन जगावे लागते. यासाठी शिक्षण खंडित झालेल्या व सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे वैयक्तिक समुपदेशन करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लक्ष्य फाऊंडेशनने हाती घेतलेले आहे.
- आदिवासी समाजातील इ. १० वी मार्च २०१० मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म लक्ष्य फाउंडेशनकडून भरण्यात आले. त्यातील आठ विद्यार्थांना आर्टस् व चार विद्यार्थ्यांना कॉमर्सला प्रवेशसाठी आर्थिक मदत फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांची ट्यूशन फी, वह्या, पुस्तके तसेच येण्याजाण्याचा प्रवासखर्च, लक्ष्य फाऊंडेशन कडून करण्यात येत आहे.
- प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी लव्हाळी गावात 15 आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना एकत्रित बोलावून त्यांची शैक्षणिक प्रगती व अडीअडचणी समजून घेण्यासाठी लक्ष्य फाऊंडेशनकडून मदत केली जात आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर व्यक्तींना बोलावून शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. राज्य शासन व केंद्र शासनाच्या आदिवासी समाजाकरिता असलेल्या सवलती व नोकरीसाठी असलेल्या संधी या विषयी मार्गदर्शन दिले जाते. अशा प्रकारे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या, स्वतःच्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत लक्ष्य फाऊंडेशनने दिवाळी व भाऊबीज साजरी केली. या प्रसंगी आदिवासी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लक्ष्य फाऊंडेशन चे आभार मानले. तसेच लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून पुढील शिक्षण पूर्ण करून, चांगली नोकरी मिळवून आपल्या आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
- सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष फाउंडेशन चे समन्वयक अनिल जाधव यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी, ललिता पाटील, विशाल भालेकर, महेंद्र रोडे, मुकेश वालोदरा, प्रवीण सावळे, वैशाली सावळे, चंद्रकांत कडव, सुलक्षणा सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
- लक्ष्य फाउंडेशनची दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसह साजरी.
- दैनिक बहुजनरत्न लोकनायक (दि. १३ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- लक्ष्य फाउंडेशन ची आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
- आदिवासी बांधव आजही वर्षानुवर्षे अत्यंत कष्टदायक जीवन जगत आहेत. त्यांच्यात असलेला शिक्षणाचा अभाव लक्षात घेऊन लक्ष्य फाउंडेशन पुढे सरसावली आहे. आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी आठवी ते दहावी दरम्यान शिक्षण अर्धवट सोडून देता. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आलेल्या विविध योजनांपासून त्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळेच त्यांना वर्षानुवर्षापासून चालत आलेला कष्टप्रद जीवन जगावं लागते. यासाठी शिक्षण खंडित झालेल्या व सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे वैयक्तिक समुपदेशन करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लक्ष्य फाऊंडेशनने हाती घेतले आहे. आदिवासी समाजातील 10 वी (मार्च 2010) मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन ऍडमिशन फॉर्म लक्ष्य फाउंडेशनकडून भरण्यात आले होते. त्यातील आठ विद्यार्थ्यांना आर्ट व चार विद्यार्थ्यांना कॉमर्सला प्रवेशसाठी आर्थिक मदत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी, ललिता पाटील, विशाल भालेकर, महेंद्र रोडे, मुकेश वडोदरा, प्रवीण सावळे, वैशाली सावळे, चंद्रकांत कडव आणि सुलक्षणा सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
- लक्ष्य फाउंडेशन ची आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
- दैनिक गावकरी (दि. १४ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- लक्ष्य फाऊंडेशनची दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसह साजरी.
- लक्ष्य फाउंडेशन बदलापूर या सामाजिक संस्थेने अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी गावातील 15 आदिवासी पाड्यातील विद्यार्थी विद्यार्थीनी समवेत दिवाळी व भाऊबीज सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
- लक्ष्य फाउंडेशनच्या शिक्षक, अभियंते व कार्यकर्त्यांनी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्यचे अध्यक्ष शिरीष पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य आबासाहेब चासकर, जानवी चारिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आशाताई मित्तू, कॅनडाच्या डर्टी वॉल प्रॉजेक्टचे केन रायन, पत्रकार ग. वि. खरात हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चासकरांनी आदिवासी विद्यार्थींची शालेय गळती थांबविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल लक्ष्य फाउंडेशनचे अभिनंदन केले. आदिवासी बांधव आजही वर्षानुवर्ष अत्यंत कष्टदायक जीवन जगत आहेत. त्यांच्यात असलेला शिक्षणाचा अभाव लक्षात घेऊन लक्ष्य फाउंडेशन पुढे सरसावली आहे. आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये अर्धवट शिक्षण सोडून देतात. त्यामुळे शासनाने आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आखलेल्या विविध योजनांपासून त्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे त्यांना वर्षानुवर्षापासून चालत आलेले कष्टप्रद जीवन जगावे लागते. यासाठी शिक्षण खंडित झालेल्या व सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे वैयक्तिक समुपदेशन करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लक्ष्य फाऊंडेशनने हाती घेतलेले आहे. आदिवासी समाजातील इयत्ता १० वी मार्च २०१० मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना आर्ट व चार विद्यार्थ्यांची ट्यूशन फी, वह्या, पुस्तके, तसेच येण्याजाण्याचा प्रवास खर्च लक्ष्य फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या, स्वतःच्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटवू इच्छिणारे विद्यार्थी समवेत लक्ष्य फाउंडेशनने दिवाळी व भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी आदिवासी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अत्यंत भावुक होऊन, लक्ष्य फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्य फाउंडेशन चे समन्वयक अनिल जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी, ललिता पाटील, विशाल भालेकर, महेंद्र रोडे, मुकेश वडोदरा, प्रवीण सावळे, चंद्रकांत कडव आणि सुलक्षणा सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
- लक्ष्य फाऊंडेशनची दिवाळी आदिवासी विद्यार्थ्यांसह साजरी.
- दैनिक सकाळ (दि. १६ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- लक्ष्य फाउंडेशनची दिवाळी आदिवासी पाड्यात साजरी.
- बदलापुरातील लक्ष्य फाउंडेशनने अंबरनाथ तालुक्यात असलेल्या लव्हाळी गावामध्ये 15 आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसह दिवाळी आणि भाऊबीज अनोख्या पद्धतीने साजरी केली. या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आबासाहेब चासकर, जान्हवी चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आशाताई मित्तू, कॅनडाच्या डर्टी वाल प्रोजेक्टचे केन रायन व पत्रकार ग. वि. खरात, ऍश्ले परेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
- आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठीचा उपक्रम शिरीष पाटील यांनी हाती घेतला आहे. शाळाबाहेर पडलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम लक्ष्य फाउंडेशन करीत आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज फॉऊंडेशनने भरून घेतले आहेत. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी लव्हाळीमध्ये 15 आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात. त्यावर त्यांना समुपदेशन केले जाते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॉऊंडेशन चे समन्वयक अनिल जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी, ललिता पाटील, विशाल भालेकर, महेंद्र रोडे, मुकेश वडोदरा, वैशाली सावळे, चंद्रकांत कडव आणि सुलक्षणा सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. येथील आदिवासींच्या चेहऱ्यावर दिवाळी साजरी केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
- लक्ष्य फाउंडेशनची दिवाळी आदिवासी पाड्यात साजरी.
- दैनिक सम्राट मुंबई (दि. १८ नोव्हेंबर २०१० रोजीच्या) अंक मध्ये प्रकाशित
- लक्ष्य फाऊंडेशनचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
- बदलापूर येथील लक्ष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे लव्हाळी गावात १५ आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षक, अभियंते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिरीष पाटील, पत्रकार आबासाहेब चासकर, जान्हवी ट्रस्टच्या आशा मित्तू, कॅनडाचे केन दायन, ग. वि. खरात, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लव्हाळी गावात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात येत असून त्यांना संस्थेतर्फे मदत केली जाते. मान्यवर व्यक्तींकडून शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते.
- सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जाधव, राजेंद्र सूर्यवंशी, ललिता पाटील, विशाल भालेकर, महेंद्र रोडे, मुकेश वालोद्रा, प्रवीण सावळे, चंद्रकांत कडव, सुलक्षणा सूर्यवंशी परिश्रम घेत आहे.
- लक्ष्य फाऊंडेशनचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम
Moments That Touched Hearts
The highlight of the day was not the gifts or the ceremony—it was the faces of hope and joy.
- Students, who had been taking free coaching and support from Lakshya Foundation for months, now felt recognized and valued for their courage to continue learning.
- Many expressed heartfelt gratitude for guidance, mentorship, and the tangible support to continue their studies.
- For volunteers, seeing the sparkle of excitement in their eyes reaffirmed the power of empathy, not charity.
Through this event, we showed the children that taking action for one’s future is worth celebrating—a lesson more powerful than any Diwali fireworks.
Why This Day Matters
This Diwali was not just a festival; it was a symbol of inclusion, hope, and opportunity. It exemplified Lakshya Foundation’s ethos:
- To walk with students, not above them.
- To make education accessible and celebrated, even for the most marginalized.
- To create moments where joy, recognition, and learning intersect.
For Lavhali’s tribal students, this Diwali was a festival of light, opportunity, and belonging. For Lakshya Foundation, it was a reaffirmation that every child deserves to dream, learn, and shine.












